मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पावसाने दमदार सलामी दिली. रत्नागिरीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यानंतर आता पुढच्या ४८ तासामध्ये मान्सून राज्याच्या इतर भागांमध्ये सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ जून रोजी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगरच्या काही भागात वादळ, वीजांचा कटकडाट आणि वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज आयएमडी (भारतीय हवामान विभाग) मुंबईने वर्तवला आहे. 


दुसरीकडे १३ जून रोजी जळगाव, पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 


येत्या ४ ते ५ दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याशिवाय ४८ तासांत मुंबई आणि उत्तर कोकणसह बऱ्याचशा भागात मान्सून दमदार हजेरी लावेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने दिला आहे. 


निसर्ग चक्रीवादळामुळं मान्सून साधारण आठ दिवसांनी लांबला होता. पण, आता मात्र त्याच्या प्रवासातील अडथळे दूर झाले आहेत.


पाहा महाराष्ट्रात असा असेल मान्सूनचा प्रवास