Monsoon Update: सावधान! पुढचे दोन दिवस संकट होऊन कोसळणार पाऊस, पाहा तुमच्या भागात काय असेल परिस्थिती
बऱ्याच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Monsoon Updates : देशातील बहुतांश भागात पावसाळी ऋतूच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. या टप्प्यातह वरुणराजा तुलनेनं जास्त बरसताना दिसत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशभरातील विविध राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain Updates )
ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्था, हिमाचल प्रदेशमधील काही भाग या ठिकाणी पावसाची हजेरी असेल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार...
बंगालच्या खाडीतील उत्तर भागात चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बुधवारी पश्चिम बंगालमधील गांगेय क्षेत्रामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. सदर परिस्थितीमुळे कोलकाता क्षेत्रात पुढील दोन दिवस पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान पावसाचं रौद्र रुपही पाहायला मिळू शकतं.
महाराष्ट्रातील परिस्थिती
(Maharashtra Rain News) सध्याच्या घडीला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील काही भागात ऊन- पावसाचा खेळ सुरु असला तरीही पूर्णपणे निरभ्र आकाश पुढील काही दिवस पाहता येणार नाही.
(Konkan Ganeshotsav) कोकणच्या दिशेनं सध्या गणोशोत्सवाच्या निमित्तानं जाणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरीही त्यांनी तिथं होणाऱ्या पावसाचाही आढावा घेणं महत्त्वाचं असेल. कारण कोकणात झालेल्या पावसामुळं सध्या बऱ्याच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही भागांमध्ये बाजारपेठांवरही पावसाचा परिणाम दिसून येत आहे.
पुढील काही दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी भागात वरुणराजा दमदार हजेरी लावू शकतो. त्यामुळं पावसाचा अंदाज घ्या आणि त्यानुसारच तुमच्या दिवसाची आखणी करा.