CM च्या कामाची आम्ही तारीफ करत होतो, आता सगळे वाया गेले - जलील
कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले होते. मात्र,
औरंगाबाद : कोरोनाचे संकट असताना लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये थोडी सूट देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वॉईन्स शॉप सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राज्यभरात दारुसाठी एकच गर्दी उसळ्याचे दिसून आले. भल्ल्या मोठ्या रांगाच रांगा दिसून आल्यात. यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यानंतर रेड झोनमधील दुकाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दारु दुकाने सुरु करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आम्ही कौतुक करत होतो, पण आता सगळे वाया गेले आहे, असे जलील म्हणालेत.
रेडझोन असताना दारुची दुकाने उघडली कशीत, असा प्रश्न करत आम्ही लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर उतरु, महिलांनाही याविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करु, वेळप्रसंगी आम्ही तीव्र विरोध करु, असा इशारा त्यांनी ट्विट करत प्रशासनाला दिला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असताना दारु दुकाने कशी सुरु होतात, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
औरंगाबादमध्ये दारुचे एक दुकानही उघडू दिले जाणार नाही. दारु घेण्यासाठी रांगेत असलेल्या सर्वांची शिधापत्रिका रद्द करण्याची सरकारला मी विनंती करतो. तसेच दारु घेणाऱ्यांना शासकीय रेशनची आवश्यकता नाही. जेव्हा ते दारु विकत घेऊ शकतात. तेव्हा ते अन्नही खरेदी करु शकतात, असे सांगत राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.