Dadar railway station :दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र.1 आणि 2 वरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार आहे. मध्य रेल्वेच्या ( CENTRAL RAILWAY ) दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे 15 सप्टेंबरपासून दादरहून सुटणा-या लोकल्स परळमधून सुटणार आहेत.


प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची रुंदी वाढवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा रुंदीने छोटा आहे. मात्र, येथून धीम्या लोकल जात असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची तुंडूब  गर्दी असते. यामुळे अपघाताची देखील भिती असते. यामुळेच मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. 
15 सप्टेंबर 2023 पासून, दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी, दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट लोकल परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील. गर्दीचे उत्तम व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या सोयीसाठी दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर प्लॅटफॉर्म क्र. 1 ची सध्याची लांबी 270 मीटर आणि रुंदी 7 मीटर आहे. सध्याची रुंदी 7 मीटरवरून 10.5 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुंदी अतिरिक्त 3.5 मीटरने वाढेल. हे काम शुक्रवार पासून सुरू होणार आहे. यासाठी 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुढील 2 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


रुंदी वाढल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 चे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर FOB (फूट ओव्हर ब्रिज) पायऱ्यांची रुंदी वाढवणे देखील सुलभ होईल. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर नवीन एस्केलेटरची तरतूद देखील सुलभ होईल. सध्या दादर प्लॅटफॉर्म क्र. 1/2 मध्ये एकूण 2 FOB (फूट ओव्हर ब्रिज) आहेत. या रुंदीकरणाच्या कामासाठी, दादर प्लॅटफॉर्म क्र.1 वरून सुरू होणाऱ्या/समाप्त होणाऱ्या सर्व स्लो लोकल (अप + डाऊन). 2 चा विस्तार परळ उपनगरीय टर्मिनसपर्यंत करण्यात आला आहे. अशा प्रकारे दादरहून धीम्या गतीने धावणार्यार/टर्मिनेटेड लोकल 15 सप्टेंबरपर्यंत पुढील सूचने पर्यंत परळ स्थानकात शेवटचा थांबा घेतील आणि येथूनच या लोकल सुटतील.


असे आहे लोकलचे वेळापत्रक


• ठाणे-दादर 08.07 वाजता दादरला  पोहोचणारी 08.13 वाजता परळला पोहोचेल आणि 08.17 वाजता परळहून कल्याणसाठी निघेल.
• टिटवाळा-दादर 09.37 वाजता दादरला पोहोचणारी  परळला 09.42  पोहोचेल आणि कल्याणसाठी 09.40 वाजतापरळहून कल्याणसाठी  निघेल .
• कल्याण-दादर 12.55 वाजता दादरला पोहोचणारी, 12.58 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी 13.01 वाजता निघेल.
• ठाणे-दादर 17.51 वाजता दादरला  पोहोचणारी 17.54 वाजता परळला पोहोचेल आणि 17.56 वाजता परळहून डोंबिवली साठी निघेल.
• ठाणे-दादर 18.10 वाजता दादरला पोहोचणारी परळपर्यंत धावेल आणि 18.13 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी 18.15 वाजता निघेल.
• डोंबिवली-दादर 18.35 वाजता दादरला पोहोचेल, 18.38 वाजता परळला पोहोचेल आणि कल्याणसाठी 18.40 वाजता परळ निघेल.
• ठाणे-दादर 19.03 वाजता दादरला पोहोचणारी  19.06 वाजता परळला पोहोचेल आणि 19.08 वाजता परळ कल्याणसाठी निघेल.
• डोंबिवली-दादर 19.39 वाजता दादरला पोहोचणारी, 19.42 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी 19.44 वाजता निघेल.
• ठाणे-दादर 19.49 वाजता दादरला पोहोचणारी  19.52 वाजता परळला पोहोचेल आणि 19.54 वाजता परळ ठाणे साठी निघेल.
• कल्याण-दादर 20.20 वाजता दादरला पोहोचणारी, 20.23 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी 20.25 वाजता निघेल.
• ठाणे-दादर 22.20 वाजता दादरला पोहोचणारी  22.23 वाजता परळला पोहोचेल आणि 22.25 वाजता परळ ठाणे साठी निघेल.