मुबंई : School News : विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील सर्व शाळांमध्ये  पुस्तकांबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे कमी होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांच्या पाठीवर आता पुस्तकांचा भार कमी होणार आहे. त्यामुळे दप्तराचा भार पेलवणारा होणार आहे. इयत्ता पहिलीसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये नियम लागू होणार आहेत. तर इयत्ता दुसरीसाठी 101 तालुक्यात एकात्मिक पुस्तकं लागू होणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षासाठी राज्याकडून सर्व तयारी सुरु आहे.


शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील न पेलवणारा पुस्तकांचा भार कमी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कृतीशील पावले टाकण्यात येत आहेत. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी केंद्रीय समितीने शिफारस केली होती. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये तर दुसरीसाठी 101 तालुक्यांमध्ये एकात्मिक पुस्तकं लागू होणारे आहे.