गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; `या` तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंग
Ganeshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
Ganpati Special Train 2024 Booking Date : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे २० अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. ७ ऑगस्टपासून याचे आरक्षण सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सवासाठी आतापर्यंत २२२ गणपती विशेष रेल्वे जाहीर केल्या आहेत.
मध्य रेल्वे खाली दिलेल्या तपशिलानुसार, आगामी गणपती महोत्सवादरम्यान गणपती भक्तांच्या फायद्यासाठी आतापर्यंत जाहीर केलेल्या २०२ गणपती विशेष गाड्यांव्यतिरिक्त २० गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. आतापर्यंत एकूण २२२ गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे.
सर्व गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग दि. ०७.०८.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर उघडणार आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
असं आहे रेल्वेचं गणपती विशेष वेळपत्रक
१) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)
01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दि.०६.०९.२०२४, दि.०७.०९.२०२४, दि.१३.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी २०:०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01032 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४, दि. ०८.०९.२०२४, दि. १४.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी रात्री ०८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी १७:१५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२१ डब्बे)
२) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
01443 विशेष गाडी पनवेल येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01444 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)
३) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
01447 विशेष गाडी पुणे येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01448 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)
४) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)
01441 विशेष गाडी दि. ११.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01442 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)
५) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)
01445 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01446 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ११.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)