`सुरुवात नवनीत राणा यांनी केलीय आम्ही...` इम्तियाज जलील यांच्याकडून अपमानास्पद शब्दांचा प्रयोग
Imtiaz Jalil On Navneet Rana: सुरुवात नवनीत राणा यांनी केली असून अंत आम्ही करू असं ही जलील म्हणाले.
Imtiaz Jalil On Navneet Rana: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना इशारा दिलाय. आमच्या नादी लागू नका असा इशारा जलील यांनी अकोल्यात आयोजित सभेत राणांना दिलाय. हनुमान चालीसा वाचायची असल्यास आपल्या घरात वाचावी चार भिंतीच्या बाहेर उद्धव ठाकरेंच्या घरासमोर का? असा सवालही जलील यांनी विचारलाय..तर सुरुवात नवनीत राणा यांनी केली असून अंत आम्ही करू असं ही जलील म्हणाले.
सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षाचे लोक आतून आरएसएसोबत
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षाचे लोक आतून आरएसएसशी जुळलेले असल्याचं खळबळजनक वक्तव्य एमआयएम यावेळी पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय..सध्याच महाराष्ट्रात सुरू असलेल राजकारण हे देशातील सर्वाधिक गलिच्छ राजकारण असल्याचं ही ते म्हणाले...तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा जलील यांनी केलं आहेय.
नितेश राणेंचा इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा
लवजीहाद आणि लॅन्डजिहाद विरोधात नितेश राणे यांची जाहीर सभा अकोला जिल्ह्यातील निंबा फाट्यावर पार पडली. सकल हिंदू समाजाच्यावतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलतांना राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि इम्तियाज जलील यांचा चांगलाच समाचार घेतलाय.
'आता दगडांच्या बदल्यात हा निलेश राणे....' गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान
अमोल मिटकरी आपला जुना माणूस असून आपण त्याला समजावणार असल्याचं नितेश राणे म्हणाले. तर घरात बसून टीव टीव करण्यापेक्षा जिल्ह्यात काय सुरू आहे? याकडे लक्ष देण्याच सल्ला नितेश राणेंनी दिलाय. यासोबतच मीडियात न बोलता मला फोन करून बोलावं असा सल्ला देखील त्यांनी दिलाय...
'असे भ्याड हल्ले...महाराष्ट्रात राजकीय संस्कृती...' राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?
वॅक्स बोर्डच्या संदर्भात बोलतांना त्यांनी हे बोर्ड लवकरच बंद होणार असल्याच म्हंटलंय. तर वैभव नाईकांनी दिलेल्या इशाऱ्यावर नितेश राणे यांनी बोलणं टाळलं. आपल्या जाहीर भाषणातून नितेश राणे यांनी टिपू सुलतान, एमआयएम अध्यक्ष असोद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावरही निशाणा साधला.