पालघरमधील प्रसिद्ध शाळेत धक्कादायक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लिल फोटो दाखवले आणि...
शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. याच ज्ञानमंदिरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीसह अश्लिल कृत्य केले आहे. पालघरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Palghar Crime News : शिक्षक हे नविन पिढी घडवण्याचे काम करतात. मात्र, एका शिक्षकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लिल फोटो दाखवून तिच्यासह अश्लिल कृत्य केले आहे. पालघरमधील प्रसिद्ध शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थिनीनेच याची तक्रार केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मोबाईल मध्ये अश्लील फोटो दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रसिद्ध शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईल मधले अश्लील फोटो दाखवून हा नराधम शिक्षक या विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे करत होता. शिक्षकाच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनीने तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तारापूर पोलीस ठाण्यात 354 , सह पॉक्सो सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सध्या या नराधम शिक्षकाला तारापूर पोलिसांनी अटक केली असून तारापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
6 वर्षाच्या चिमुकलीवर क्रुर अत्याचार करत तिची हत्या
अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर क्रुरपने अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा छडा लावण्यात नांदेड पोलिसाना सहा दिवसानंतर यश मिळाले. मुदखेड तालुक्यातील एका गावातील 6 वर्षीय चिमुकली 14 जानेवारी रोजी दुपारपासून बेपत्ता झाली होती. 15 जानेवारी रोजी सकाळी तिचा मृतदेह गावापासून दूर 12 किलोमिटर अंतरावर मुदखेड उमरी रोडवर आढळला होता. मुलीवर क्रूरपणे अत्याचार करून नंतर तिची हत्या केल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये निष्पन्न झाले होते. या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संवेदनशील घटना असल्याने पोलिसानीही दिवसरात्र एक करून गावातच छावणी बनवली होती. अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेची टीम, मुदखेड पोलीसांचे पथक सहा दिवस गावातच मुक्कामी राहून घटनेचा तपास करत होते. अखेर पोलिसाना यश मिळाले आणि पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या श्वानाने वेळोवेळी एकच ठिकाण दाखवल्याने पोलिसाना खात्री पटली आणि पोलीसांनी त्याला उचलले. गावातीलच 23 वर्षीय दशरथ पांचाळ याने दुष्कृत्य केल्याचे उघड झाले. आरोपीने गुन्हा कबूल केला असून या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीनेही तपास करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.