विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत (HSC Board Exams ).  बारावीच्या परीक्षेत घोळात घोळ सुरु आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले ( Error in English Subject Question Paper). प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. यानंतर आता बीडमध्ये वेगळाच प्रकार घडला आहे. मराठी मध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना इंग्रजी भाषेतील प्रश्न पत्रिका देण्यात आली (Marathi medium student get English language  English language question paper). शेवटी इंग्रजी भाषेतील प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करुन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या प्रकारामुळे बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवसांपासून गोंधळ पाहायला मिळत आहे.  प्रश्न पत्रिकेत उत्तरच छापून आली तर कुठे प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आल्या. तर बीड जिल्ह्यामध्ये कम्प्युटर टेक्निकलचा पेपर मराठीमध्ये देणाऱ्या विद्यार्थांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्यात आली. 


मराठी भाषेमध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा ही इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका पाहून गोंधळ उडाला. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या मुलांच्या हाती इंग्रजीतील प्रश्नपत्रिका पत्रिका पडल्यामुळे विद्यार्थी चांगलेच बुचकुळ्यात पडले.  


इंग्रजी प्रश्नांचे भाषांतर करून मुलांना प्रश्न मराठीत करून देण्याची सेंटर चालकांवर वेळ


काही वेळानंतर परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनाही चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर इंग्रजी प्रश्नांचे भाषांतर मराठीत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही वाया गेला.  हा गोंधळ पाहून विद्यार्थी चक्रावून गेले. इंग्रजी प्रश्नांचे रूपांतर मराठी प्रश्नांमध्ये केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला.


बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर


यंदाच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यापासूनच बोर्डाचा या नात्याकारणाने पेपर मधील गोंधळ समोर येत आहे. पुन्हा एकदा बोर्डाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. मराठीत परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना चक्क इंग्रजीमध्ये पेपर आल्याने तसेच इंग्रजीमध्ये आलेला पेपर मराठीत भाषांतर करून देण्याची वेळ तेथील शिक्षकांवर आल्याने बोर्डाच्या नियोजनावर  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


परीक्षा विभाग मात्र गाफीलच


अनेक वेळा बोर्डाच्या पेपर मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. असं असलं तरी परीक्षा विभाग मात्र पूर्णपणे डोळे झाक करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी जेव्हा अशा त्रुटी आढळून येत आहेत. त्यावेळी ह्या त्रुटी सुधारणा गरजेचे असतं. मात्र, या त्रुटी सुधारणा होत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या चुका बोर्डांच्या पेपरमध्ये होताना दिसत आहेत.  त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल देखील पालक आणि विद्यार्थी विचारत आहेत एकूणच चांगली परीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी बोर्डाकडून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले जात आहे.