Chandrapur Crime News : चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारीच निघाला घरफोडीचा आरोपी निघाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. चोरी करण्यामध्ये धक्कादायक कारण समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारीच घरफोडीचा आरोपी निघाला आहे. चंद्रपूर पोलीस दलात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे.  


चंद्रपूर शहरातील सहकारनगर भागात काही दिवसांपूर्वी 4 हजारांची तर सप्टेंबर महिन्यात शहरातल्याच उपगनलावार लेआऊट मध्ये 80 हजारांची घरफोडी झाली होती. रामनगर पोलिसांच्या तपासात या दोन्ही घरफोडया नरेश डाहूलेने केल्याचं निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन शेयर ट्रेडिंगच्या सवयीमुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर 22 लाखांचं कर्ज झालं होतं. त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.  नरेश डाहुलेच्या अटकेमुळे चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.


ऍन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस असल्याचे भासवून लेडीज बारवर छापा मारण्याचा प्रयत्न फसला


ऍन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस असल्याचे भासवून नेरुळ मधील राजमहाल सर्विस बार ऍण्ड लॉजींग बोर्डींगवर छापा मारुन बार चालकाकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांच्या टोळीला नेरुळ पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीत दोन पत्रकारांचा देखील समावेश असल्याचे तपासात आढळून आले आहे.   या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यामध्ये संजय शंकर निराळे (47),सागर संजय नलावडे (32), ज्योती प्रमोद पांचाळ (34), हर्षला जोसेफ जॉन (34), दिव्या बाबुराज नायर (30) आणि वैशाली संदीप पाटील (33) या सहा जणांचा समावेश आहे. हे सर्वजण मानखुर्द व आजुबाजुच्या परिसरात राहण्यास आहेत. या टोळीने नेरुळ मधील राजमहाल सर्विस या लेडीज बार मालकाकडून पैसे उकळण्यासाठी गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास या बारवर पोलिसांप्रमाणे छापा मारला होता. त्यासाठी या टोळीतील चार सदस्यांनी आपल्या गळ्यामध्ये अँटी  करप्शनचे ओळखपत्र घातले होते, तर इतर दोघांनी पत्रकाराचे ओळखपत्र घातले होते. त्यानंतर या टोळीने बारमधील सर्व ग्राहकांना बाहेर काढून बार मधील महिला वेटर्ससोबत धक्काबुक्की करत त्यांना किचनमध्ये बंद करुन ठेवले. त्यानंतर त्यांनी बार चालकासोबत वाटाघाटी करण्यास सुरुवात केली होती.  यावेळी बार मालकाने स्थानिक पोलिसांना संपर्क  साधून त्यांना पकडून दिले.