Chhatrapati Sambhaji Nagar News : प्रामाणिक प्राणी अशी कुत्र्यांची ओळख. मात्र, आता कुत्र्यांच्या हुशारीचे देखील दर्शन झाले आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपानं मोकाट कुत्र्यांना पकडून डांबल होते. मात्र, पिंजऱ्यात कैद केलेले कुत्रे चक्क कडी उघडून पसार झाले आहेत. कुत्र्यांची ही करामत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंजऱ्यातून पलायन करणाऱ्या कुत्र्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरव्ही कैदेत ठेवलेली माणसं पळून जातात असं आपण नेहमीच पाहिल आहे. मात्र, कोंडवाड्यात पिंजऱ्यात ठेवलेली कुत्रेही त्यांची अक्कल वापरून कसे पळून जातात हा सगळा प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुढे आला आहे. संभाजीनगर मध्ये काही भटके कुत्रे एका पिंजऱ्यात कैद करण्यात आले होते. 


यातील एक कुत्र्याने पिंजऱ्याची कडी उघडली. CCTV फुटेजमध्ये कुत्रा पिंजऱ्याच्या दरावाजाची कडी उघडताना दिसत आहे. पिंजऱ्याची  कडी उघडून कुत्रा आणि त्यानंतर त्याच्यासोबत काही कुत्रे पळून गेले आहेत. कुत्र्यांचा हा व्हिडिओ आता चांगला व्हायरल होत आहे. आता या प्रकारानंतर महापालिकेला कुत्र्यांच्या पिंजऱ्याला सुद्धा कुलूप लावावे लागेल असे दिसत आहे.



औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत 


औरंगाबाद शहरात N-9 भागात एकाच कुत्र्याने 25 ते 30 जणांना चावा घेतला होता. एका रात्रीत 25 ते 30 जण जखमी झाले होते.  यातील 17 जणांवर  घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घाटी रुग्णालयात अँटी रेबीज लसीचा तुटवडा असल्याने सुद्धा लोकांना त्रास झालाय, शहरातील कचरा समस्ये मुळे शहरात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे आणि त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.


औरंगाबादमध्ये  कुत्र्यांचं भांडण पोहोचलं पोलीस ठाण्यात 


औरंगाबादमध्ये   दोन कुत्र्यांचा वाद सध्या पोलीस ठाण्यात पोहोचला. सुनिता मिरगणे सकाळी आपल्या देशी जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी गेल्या असता, एक विदेशी जातीचा कुत्रा समोरून आला आणि त्यांनी सुनिता मिरगणे यांच्या कुत्र्यावर हल्ला चढवला. सुनिता मिरगणे त्या विदेशी कुत्र्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असताना, त्या कुत्र्यानं सुनिता यांच्या हाताला चावा घेतला आणि त्यांच्या देशी कुत्र्याचं शेपूट चावा घेऊन तोडलं. या सगळ्या प्रकाराला सुनिता यांनी विदेशी कुत्रा आणि त्याच्या मालकाला दोषी धरत पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांसाठीही तसा हा गुन्हा नवाच होता. मात्र तक्रार आल्यानंतर पोलिसांनीही कुत्रा मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. कुत्र्यांच्या वादात आता कुत्र्यांचे मालकही समोरासमोर आले आहेत. या सगळ्यात आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.