गडचिरोलीत थरार! मुलानेच नातेवाईंच्या मदतीने पित्याला संपवले; तपासात धक्कादायक खुलासा
गडचिरोलीत तिहेरी हत्याकांड घडले. मुलानेच नातेवाईंच्या मदतीने पित्याची हत्या केली.
gadchiroli crime news : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील गुंडापुरीतल्या तिहेरी निर्घृण हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. देवपूजारी असलेल्या बापाला जादूटोण्याच्या संशयावरून सख्खे मुलं आणि नातेवाईकांनी ठार केले आहे. गडचिरोली पोलीसांनी नऊ आरोपींना जेरबंद केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत 6 डिसेंबर तिहेरी हत्याकांड झाले होते. देवु कुमोटी 60 वर्षे, सौ. बिच्चे देवु कुमोटी 55 वर्षे आणि 10 वर्षाची मुलगी या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापुन हत्या करण्यात आली होती. मृतकाचा मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
तपासात धक्कादायक खुलासा
खळबळजनक हत्याकांडात पाच तपास पथके गठीत करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिसांचा संशय बळावला. मृतक देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी असुन तो जादुटोना करुन अनेक लोकांना आजारी पाडत असल्याने त्या लोकांचा पुढे मृत्यु होतो असा संशय गुंडापुरी व त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता. ज्यात पोलिसांना तथ्य आढळले नाही. मात्र या संशयाने ग्रामस्थ संतप्त होते. सोबतच कुटुंबीय त्रस्त होते. त्यातून कट रचून मयताच्या दोन्ही मुलांनी व नातेवाईकांनी ही हत्या केली.
आजोळी आलेली नात या सर्वांची साक्षीदार असल्याने तिलाही संपविण्यात आले. लोकांचे मृत्यू आणि आजारपणास पुजारी देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन मृतकाचे मुले रमेश कुमोटी, विनु कुमोटी (फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक जोगा कुमोटी, गुना कुमोटी, राजु आत्राम (येमला), नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी, तसेच मृतकाचा जावई तानाजी कंगाली यांनी थंड डोक्याने हे कृत्य केले आहे.
चुलत्याची हत्या करुन मुंडकं घेऊन बाईकवर फिरला
जमिनीच्या वादातून सावत्र पुतण्यानं वृद्ध चुलत्याचा खून केल्याची घटना शेवरे गावात घडली.. धक्कादायक बाब म्हणजे शंकर जाधव या चुलत्याचा खून केल्यानंतर आरोपी शिवाजी जाधव मोटारसायकलवरून त्यांचं मुंडकं घेऊन फिरत होता.. माळी नगर परिसरात आल्यानंतर त्यानं मुंडकं आणि मोटारसायकल तिथंच टाकली. त्यानंतर तो अकलूज पोलिसांना शरण गेला... जमिनीचा तुकड्यासाठी रक्ताच्या नात्याचा निर्घृण खून करण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत, हे कटू वास्तव यानिमित्तानं पुन्हा समोर आलंय