Maharashtra HSC Exam 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत (HSC Board Exams ). परीक्षेत घोळ, कॉपी मुक्त अभियान आणि विद्यार्थींनीची धक्कादयक तपासणी अशा प्रकरणांमुळे बारीची परिक्षा चांगलीच चर्चेत आलेय. त्यातच हिंगोलीत (Hingoli) एक सकारात्मक चित्र पहायला मिळाले. तान्ह्या लेकराला बाहेर ठेऊन एका आईने बारावीची परीक्षा दिली आहे. शाळेबाहरेच झाडाला झोळी बांधून या मातेने आपला काळजाचा तुकडा या झोळीत ठेवला. आईचे कर्तव्य पार पाडत शिक्षणाची जिद्द मनाशी बाळगणाऱ्या या मातेचे कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोलीत एका मातेने सात महिन्यांच्या तान्हुल्याला तीन तास परीक्षा केंद्राबाहेर ठेऊन बारावीचा पेपर सोडवला. या दरम्यान तिचा पती बाळाचा सांभाळ करीत होता. तळपत्या उन्हात साडीचा झोका करून बाळाला या झोळीतच झोपवले. 


पुनम माधव इंगोले असे या आईचे नाव आहे.  परभणी येथील या मातेचा बारावीचा पेपर होता. सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर तिचा नंबर आल्याने तिला बाळ आणि पतीसह सेंटरवर जावं लागलं, दरम्यान हे चित्र पाहून या जोडप्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.


पेपर न तापसणाऱ्यांवर कारवाई अटळ


दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका न तपासताच परत पाठवाल्यास शाळा महाविद्यालयाची मंडळ मान्यता होणार रद्द होणार अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली. शिक्षक वेगवेगळी कारण सांगत उत्तर पत्रिका तपासण्यास नकार देत असल्याने बोर्डाने निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, तसेच स्वायत्त तत्त्वावरील प्राध्यापकांनी दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर मात्र बहिष्कार टाकला आहे. त्यांचे आंदोलन सुरुय त्यामुळं बोर्डाने या सगळ्यांनाच हा इशारा दिला.


फोन करून बोलावले तरीही बारावीचे विद्यार्थी परीक्षेला आले नाहीत


राज्यभरात यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत.  जालन्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस, केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावं लागलं.   बारावीच्या हिंदी विषयाच्या पेपरवेळी हा प्रकार पहायला मिळाला. हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. मात्र केंद्र प्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागे परतावं लागलं.