मुंबई : राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. राज्यात आज (22 जुलै) कोरोना बाधितांपेक्षा काही प्रमाणात कोरोनातून मुक्त झाल्याची संख्या जास्त आहे. तसेच राज्याच्या पॉझिटीव्हीटी दरात किंचीतशी वाढ झाली आहे. तर मृत्यू दरात ही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झालीये. (in Maharashtra Today 22 july 2021 7 thousand 302 corona patients found)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आज दिवसभरात एकूण 7 हजार 302 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 7 हजार 756 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 16 हजार 506 जण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे (Maharashtra Recovery Rate) होण्याचा दर हा 96.34% इतकं झालंय.


किती मृत्यू? 


कोरोना रुग्णसंख्येप्रमाणे मृतांच्या संख्येतही चढ-उतार आहेत. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यामुळे राज्याचा मृत्यू दर (Maharashtra Death Rate) हा आता 2.09% इतका झालाय. 


ॲक्टीव्ह रुग्ण 1 लाखांपेक्षा कमी


राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांचा हा आकडा आता लाखांच्या आत आला आहे. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार एकूण 94 हजार 168 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.