मुंबई : राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसतेय. तसेच राज्याच्या रिकव्हरी रेटमध्येही किंचीतशी वाढ झाली आहे. तर मृत्यू दरातही घट झाली आहे.  राज्यात आज (24 जुलै) एकूण 6 हजार 269 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापेक्षा अधिक रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात एकूण 7 हजार 332  जण कोरोना मुक्त झाले आहेत. (in maharashtra Today 24 july 2021 6 thousand 269  corona patients registered)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आतापर्यंत एकूण  60 लाख 29 हजार 817 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या दरातही किंचतशी पण दिलासादायक वाढ झाला आहे. राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये 0.2 ने  वाढ झाली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा  96.35% इतका झाला आहे.



राज्यात कोवीडमुळे दिवसभरात एकूण 224 जण दगावले आहेत. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.01% इतका झाला आहे. सध्या राज्यात 5 लाख 27 हजार 754  व्यक्ती होम क्वारटाईन आहेत तर 3 हजार 621 व्यक्ती संस्थातमक क्वारटाईन आहेत.


मुंबईमधील कोरोना स्थिती


मुंबईत 24 तासात 413 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 611 जण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 709809 जण कोरोना मुक्त झालेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 97 टक्के इतका झालाय. मुंबईत सध्या एकूण 5 हजार 799 सक्रिय रुग्ण आहेत.