नागपूर : नागपूरमध्ये १७ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वॉकरमध्ये खेळताना, वॉकरमधून पडून त्याला दुखापत झाली होती. आज बाळाचा मत्यू झाला आहे. रंजीत सारंग ठाकरे असं मृत बाळाचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ जानेवारी रोजी वॉकरवर खेळत असताना रंजीत पडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेडिकलमधील ट्रामा सेन्टरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यापूर्वीदेखील पाण्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पालकांनी आपलं मुलं कुठे जातंय, कुठे खेळतंय याबाबत अधिक लक्ष देण्याची गरज आहे.


सविस्तर वृत्त थोड्या वेळात...