जुना अनुभव प्रत्यक्षात कामी आला; एसटीच्या महिला कंडक्टरने केली प्रवासी महिलेची प्रसुती
एसटीच्या महिला कंडक्टरने केली प्रवासी महिलेची प्रसुती केली. या महिला कंडक्टरला जुन्या कामाचा अनुभव प्रत्यक्षात कामी आला आहे.
Nashik News : प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेत किंवा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन गर्भवती महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशीच एक घटना नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या बसमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे एसटीच्या महिला कंडक्टरने प्रवासी महिलेची प्रसुती केली आहे. महिला कंडक्टरला जुन्या कामाचा अनुभव प्रत्यक्षात कामी आला आहे.
कर्तव्य बजावणाऱ्या वाहक अर्थात महिला कंडक्टरने नर्सिंगची सेवा बजावल्याने सर्वत्र कौतूक होत आहे. नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये हा प्रकार घडला आहे. एका आदिवासी महिलेला प्रसूत कळा सुरू झाल्याने बसमधील महिला कंडक्टर प्रिया राठोड सुरक्षित ठिकाणी बस थांबवून प्रवासी महिलेची सुखरूप प्रसूती केली. महिला कंडक्टरला नर्सिंगचाही अनुभव असल्याने कंडक्टरचे कर्तव्य बजावत त्यांनी नर्स म्हणूनही सेवा बजावल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
नाशिक जिल्हातील बागलाण तालुक्यातील वडे दिगर येथील अजित शामा पवार हे आपल्या पत्नीसह सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील एका खासगी साखर कारखान्यासाठी ऊसतोड कामगार म्हणून गेले होते. त्यांच्या पत्नी पूजाबाई हिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होणार असल्यामुळे अजित यांनी कऱ्हाड येथून गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. यावेळी हा प्रकार घडल्याने दोघे पती-पत्नीने प्रियाचे आभार मानले आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये 2 महिला पोलीसांनी एका महिलेची प्रसुती केली होती. राजश्री जाधव या प्रसुतीसाठी औंध रुग्णालयाकडे जात असताना त्यांच्या पोटात दुखू लागलं. भर रस्त्यात त्रास होऊ लागल्याने त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली.. अँम्बुलन्स यायला उशीर झाल्याने या 2 महिलांनी एका खोलीत त्यांची प्रसुती केली.महिला पोलिसांचं सर्वत्र कौतुक होतंय..