नाशिक : नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटला. अंजनेरी हे हनुमंताचं जन्मस्थळ नसल्याचा दावा हनुमान मठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी केला. त्यामुळे नाशिकमध्ये आज शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकरोड इथं ही सभा झाली. मात्र, या शास्त्रार्थ सभेत बसण्याच्या जागेवरुनच वाद झाला. गोविंदानंद यांना मंचावर बसवण्यात आलं तर महंत व्यक्तींना खाली बसवण्यात आलं. यावरुन नाराज महंतांनी वाद घातला.


हनुमंतांचा जन्म अंजेनेरीमध्ये झाल्याचे इतिहास कालीन कागदपत्रे किंवा पुरावे सादर करण्याचं आव्हान गोविंदानंद सरस्वतींनी केलंय. त्यांच्या या भूमिकेवरुन त्र्यंबकेश्वरातील साधूमहंत संतप्त झाले.


तर, महंतांनी माफी मागावी यासाठी गोविंदानंद यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे महंत चांगलेच संतापले. भर सभेत गोविंदानंतर आणि महतांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर ही सभा रद्द करण्यात आली. 


 



या राड्यानंतर नाशिकमधल्या महंतांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावला. आपण काही चुकीचं बोललोच नाही त्यामुळे माफीचा प्रश्नच येत नाही. गोविदानंद खोटं बोलतायेत असा आरोप त्यांनी केला.


हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. दरम्यान, गोविंदानंदही महंतांसोबत खाली बसले आणि पोलीस बंदोबस्तात चर्चेला सुरुवात झाली.