Pune Crime News : पोटचं लेकरु म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा. लेकराला साधं खरचटलं तरी आईच्या काळजाता धस्स होते. मात्र, जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकीचा जीव घेतला आहे. एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे (Pune Crime News).अनैतिक संबंधात ही मुलगी अडथळा ठरत होती. यामुळे प्रियकरासाठी आईने (extramarital affair) पोटच्या मुलीलाच संपवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या तीन वर्षाच्या या चिमुरडीने मोठ्या विश्वासाने आईसोबत अकोले ते पुणे प्रवास केला होता. मात्र, तिला हे ठाऊक नव्हतं तिचा हा प्रवास शेवटचा असेल. कारण जन्मदाती आईच तिचा कर्दनकाळ ठरणार होती. अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती म्हणून जन्मदात्या आईनेच तिच्या नरडीचा घोट घेतला आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाटही लावली. पण एक धागा सापडला आणि पोलीस चिमुरडीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले.


2 मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशन जवळील मोकळ्या जागेत एका तीन वर्षे मुलीचा मृतदेह सापडला होता. गळा दाबून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. कुठलाही पुरावा मागे नसल्याने या चिमूरडीची ओळख पटवण्यात अडथळे येत होते. मात्र, या चिमुरडीच्या अंगावर जी शॉल होती त्यावरून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. यानंतर पोलिसांनी या महिलेला तिच्या प्रियकरासह अटक केली.


जन्मदात्या आईनेच मुलीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने या चिमुरडीला आईनेच प्रियकरासह मिळून ठार मारले होते. आरोपी महिलेचे विवाहीत आहे. तिला आणखी एक मुलगी आहे. ही महिला काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रियकरासह पुण्यात पळून आले होती.


मात्र, रात्री झोपत असताना ही चिमुरडी रडायची, त्याचा त्रास या दोघांना व्हायचा. यामुळेच त्यांनी या तीन वर्षीय निष्पाप मुलीचा खून केला.त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जन ठिकाणी फेकूनही दिला. हत्येबाबत कोणताही पुरावा मागे नसताना अतिशय कौशल्याने तपास करत पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.