रत्नागिरी : जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सध्या जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.  पण त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नव्हती.  त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता मास्क न वापल्यास आर्थिक भुर्दंड बसणार आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी खूप खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मास्क वापरणे येथे बंधनकारक करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराबाहेर अर्थात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक केला आहे.  कोणीही नागरिक मास्कशिवाय बाहेर फिरताना दिसल्यास त्याला पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.  हा नियम ग्रामीण आणि शहरी भागात देखील लागू आहे. शहरी भागात ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हा दंड वसुलीचा अधिकार देण्यात आला आहे. 


 तर शहरी भागात नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दंड वसुलीचा अधिकार देण्यात आला आहे.  त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आता मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे अन्यथा पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच आवश्यक काम असेल आणि अत्यंत गरजेचे असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.