विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : कर्ज वसुली करणाऱ्या एजंटकडून ग्राहकांना धमकवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. आता मात्र या वसुली एजंटने(recovery agent) हद्दच पार केली आहे. संभाजीनगर अर्थात औरंगाबादमध्ये( Sambhajinagar ) कर्ज वसुलीसाठी एजंटने डायरेक्ट महापालिकेची बस(municipal bus) अडवली. यामुळे एकच गोंधळ उडाला. या वसुली एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी नगर मध्ये एक खासगी फायनान्स वसुली एजंटने हा कारनामा केला आहे. बसवर कर्ज आहे असं म्हणत या एजंटने थेट मनपाची बस अडवली. एजंटचा हे कृत्य पाहून बसचा ड्रायव्हर, कंडक्टर आणि बस मधून प्रवास करणारे प्रवासी सगळेच शॉक झाले. 


थकीत कर्ज फेडलं नाही म्हणून ही बस अडवली


थकीत कर्ज फेडलं नाही म्हणून ही बस अडवली असल्याचं या एजंटसचे म्हणणं होत. बस अडवल्यानंतर या वसुली एजंटने कंडक्टर आणि ड्रायव्हरशी वाद सुरू केला. इतकंच नाही तर  बस मधल्या सर्व प्रवाशांना सुद्धा यांनी खाली उतरवले. दोन दिवसापूर्वी ही घटना घडली आहे. यानंतर महापालिकेन या चारही एजंट्सला पोलीस ठाण्यात नेलं होतं आणि तिथं समजूत घालून प्रकरण सोडवण्यात आलं होते.  मात्र, त्यानंतर महापालिकेने आता याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


महापालिकेच्या बस कुठलेही कर्ज नाही


या चारही एजंट विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. कर्ज वसुली करणाऱ्या एजंटला बसचा नंबर चुकीचा मिळाला होता. यामुळे त्यांनी महापालिकेची बस थांबवली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, महापालिकेची बस अशा पद्धतीने थांबवून गुंडगिरी करणं हे योग्य नाही असं सांगत महापालिकेने गुन्हा दाखल केला. महत्वाचं म्हणजे महापालिकेच्या बसवर कुठलेही कर्ज नाही. असे असताना एजंटने बस अडवल्याने सगळा गोंधळ उडाला.