Solapur Crime News : सोलापूर मध्ये पाच कोटींच्या दरोड्याचा डाव फसला आहे. दरोडेखोरांनी मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या बँकत दरोडा टाकण्याचा डाव रचला. दरोडेखोर बँकेत घुसले पण, त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस CCTV फुजेटच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.


असा फसला दरोड्याचा डाव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मंगळवार पेठ परिसरातील महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक गुरुवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. तीन दरवाजे तोडून चोरांनी बँकेत प्रवेश केला. मात्र, लॉकर तोडता न आल्याने बँकेतील जवळपास पाच कोटींची कॅश वाचली आहे.


दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात


बँक फोडणारी दरोजेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. बँकेचे कामकाज आटपून गुरुवारी रात्री आठ वाजता स्टाफ सह मॅनेजर आणि चेअरमन निघून गेले. यानंतर रात्री साडेआठ वाजता दोन चोरट्यांनी हातात रॉड आणि टॉर्च घेऊन तीन दरवाजे तोडून बँकेमध्ये प्रवेश केला.


बँकेतील ड्रॉवर तपासले मात्र हाती काही लागले नाही. त्यांनी बँकेची मुख्य तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये ते अयशस्वी झाले. तिजोरीत जवळपास पाच कोटी रुपये कॅश होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून बँकेने याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


चोरट्यांकडून 14 बाईक हस्तगत


मोटारसायकल चोरणाऱ्या एका टोळीला सांगलीच्या आष्टा पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांना अटक करत त्यांच्याकडून 7 लाख 63 हजार किंमतीच्या तब्बल 17 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. नामदेव बबन चुनाडे, महादेव भारत भोसले आणि गणेश भारत भोसले शी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून,या तिघांनी सांगली जिल्ह्यासह पुणे, हडपसर,जेजुरी,फलटण, कोरेगाव, पुसेगाव येथून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.आष्टा शहरात मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असताना या तिघांना पकडण्यात आले .


जेल मधून सुटून आला आणि पुन्हा केली चोरी


एक आठवड्या पूर्वी जेल मधून सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा चोरी केली.मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढत पुन्हा त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सूरज ऊर्फ गोल्टी पटिया असे या आरोपीचे नाव आहे. डोंबिवलीच्या सावरकर रोड लगत असलेल्या एका बंद घरात लाॅकरमध्ये ठेवलेले सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम सूरज ने चोरी केली होती. याची तक्रार डोंबिवली राम नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली.पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर गुप्त महितीद्वारे डोंबिवलीत राहणाऱ्या सुरज उर्फ गोल्डी पटिया या आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी अधिक तपास करत या चोरट्या कडून दीड लाखाचा मुद्देमाल ही हस्तगत केला आहे. हा एक सराईत चोर असून याच्यावर आधी तीन-चार गुन्हे दाखल आहेत.