ठाण्यात रिक्षावर माहिती फलक नाही लावले तर कडक कारवाई
सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे : सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणे शहरातील रिक्षाचालकांकडून झालेल्या विनयभंग प्रकरणानंतर वाहातूक पोलिसांनी रिक्षात चालकाची माहिती लावण्याबाबत दिलेल्या अल्टिमेटमचा रविवारी शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून धडक कारवाईला सुरुवात होणार आहे.
रिक्षात चालक मालक आणि परमिटबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. माहिती फलक न लावल्यास ५०० रुपये दंड आणि माहिती खोटी लावल्यास १००० रुपये दंड तसेच कारावास अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.