औरंगाबादमध्येही चकाकणारी वस्तू खाली पडली आणि...
Mysterious light in sky : उल्कापिंडासारखी चकाकणारी वस्तू खाली पडताना अनेकांनी पाहिली. नागरिकांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण हे इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचेच तुकडे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
औरंगाबाद : Mysterious light in sky : उल्कापिंडासारखी चकाकणारी वस्तू खाली पडताना अनेकांनी पाहिली. नागरिकांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या होत्या. पण हे इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचेच तुकडे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
न्यूझीलंडच्या माहिया बेटावरून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीपासून 430 किमी उंचीवर स्थिरावला. आकाशातून चकाकणारे दिसलेले तुकडे या रॉकेट बूस्टरचेच असावेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
दरम्यान, राज्यातील नागपूर, अमरावती आणि अनेक राज्यांमध्ये शनिवारी रात्री आकाशात रहस्यमय प्रकाश दिसून आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशात आगीचे भलेमोठे आगीचे गोळे वेगाने जाताना दिसत होते. नक्की हा काय प्रकार आहे, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचबरोबर लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि इतर जिल्ह्यात शनिवारी रात्री आकाशात आगीचे गोळे दिसून आले. प्रथमदर्शनी समोर आलेल्या व्हिडिओमधून हे उल्कापिंड असल्याचे सांगितले जात आहे. नागपूरच्या खगोलतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, कोणत्यातरी उपग्रहाचा अपघात झाला असावा, असे ते म्हणाले.