मुंबई : Income tax raids on sugar factories : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले. ( Income tax raids) यावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या रक्ताच्या नातेवाईकांवर छापेमारी करण्यात आली आहे. छापे टाकणे हे आयकर विभागाचे काम आहे. मात्र, जर राजकीय हेतूने ही छापेमारी करण्यात आली असेल तर ते दुर्दैव आहे. दरवर्षी नियमित कर भरत आहोत. माझ्या बहिणी आहेत, म्हणून धाड टाकणे याचे खूप वाईट वाटत आहे. (Income tax raids in Pune: Ajit Pawar's first reaction)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपण बऱ्याच जणांवर धाडी टाकणे सुरु आहे. मात्र, भाजपसंबंधित एकाही कारखान्यावर धाड पडलेली नाही किंवा चौकशी झालेली नाही. फक्त माझ्या बहिणी आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकता, याचे वाईट वाटत आहे. जो पक्ष केंद्रात सत्तेत आहे. त्यांच्या कोणत्या कारखान्यावर धाड पडलेली नाही, असे अजित पवार म्हणाले.


अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे ( Income tax raids) मारले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदनतेश्वर शुगर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  (Income tax officials raid offices on sugar factories) यावेळी मोठी झडती करण्यात आली आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे सांगण्यात येत आहेत.


साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काल बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.