नाशिक : गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या पावसानं नाशिकमधील धरण साठ्यात वाढ झालीय. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९१ टक्के भरलेय. तर कश्यापी ९९ टक्के, गौतमी गोदावरी ९० तर आळंदी १०० टक्के भरले आहे. एकूण धरणसाठा सत्तर टक्क्यावर पोहोचला आहे.


शेतकऱ्यांना दिलासा 


 मात्र खान्देशाचे तारणहार असलेले गिरणा धरण अद्याप ३१ टक्क्यावर आहे. मात्र या पावसानं दुष्काळग्रस्त भागात कृपादृष्टी केल्यानं शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय. तसंच पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरु झालाय. गोदावरी दुथडी भरून वाहतेय. त्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालीय.