ठाणे : NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Increased difficulty of Sameer Wankhede, case filed in Thane)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा गुन्हा दाखल करताना खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना (Liquor sales license based on false information) मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या नवी मुंबईतल्या बारचा परवाना रद्द केला होता. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी वानखेडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा सदगुरु हॉटेल आणि बारचा परवाना  ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी हा परवाना घेतला तेव्हा त्यांचे 18 वर्षांपेक्षा कमी होते. त्यानंतर या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु होती. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपला अहवाल जिल्हा दंडाधिकारी (DC) यांना सादर केला. ज्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 54 अन्वये कारवाई करुन परवाना रद्द केला आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हा दंडाधिकार्‍यांसमोर सुनावणीदरम्यान सादर केलेले पुरावे आणि त्यानुसार, समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील सदगुरु हॉटेल अ‍ॅण्ड बारचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी त्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असताना जारी करण्यात आला होता. मात्र, नियम डोळ्यासमोर ठेवून समीर वानखेडे यांना परवाना देण्यात आला, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.