Indapur Firing: बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा खून करण्यात आलाय. कोयत्याने वार करून, चाकू खुपसून विद्यार्थ्याचे आयुष्य संपवण्यात आले. बारामतीमधील या घटनेला काही तास उलटत नाहीत तोवर इंदापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. इंदापूरच्या एका कॉलेजसमोर अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय. 


एक व्यक्ती गंभीर जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अज्ञाताने केलेल्या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे.तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय.त्याला तीन राउंड लागले असल्याची ही माहिती मिळत आहे. घटना घडतात इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे


इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल


एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आली त्यानं तीन ते चार राऊंड फायर केले त्यापैकी तीन राऊंड समोरील व्यक्तीला लागले आणि यात समोरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत असून इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. ज्याच्यावर गोळीबार झाला त्याला तातडीने रुग्णालयात उपचार कमी दाखल करण्यात आले आहे.


बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा खून


पुण्याच्या बारामतीत असलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय म्हणजेच टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. येथे शिकत असलेला विद्यार्थी ओंकार भोईटेचा कोयत्याने सपासप वार करून खून झालाय.  यानंतर टीसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अथर्ववर कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. अथर्व पोळ असं खून झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे.तो टी सी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता.आरोपी ओंकार भोईटे व त्याच्या साथीदाराने हा खून केला असून आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कॉलेजमध्येच खून झाल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. हा खून का करण्यात आला? याची माहिती अद्याप समोर आली नाही.