जावेद मुलानी, झी मीडिया इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिडशिंग इथं क्षुल्लक कारणावरुन एका शेतमजुराने (Farm Laborer) दुसऱ्या शेतमजुरावर कोत्याने वार करत त्याची निर्घृण हत्या (Murder) केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुभम लालजी भारतीय वय 35 वर्ष असं खून झालेल्या शेतमजूराचं नांव आहे. शुभम भारतीय हा उत्तरप्रदेशमधील इलाहाबाद जिल्ह्यातील मेजाखास तालुक्यातील लेडडी गावचा रहिवाशी आहे. तर आरोपी नीरजकुमार लालमणी कुशवाह हा देखील त्याच गावचा रहिवाशी आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बेडशिंग इथं मिलिंद जीवनधर दोशी यांची बारा एकर जमीन आहे.  निलेश मारूती जांभळकर यांनी ही जमीन वाट्याने करायला घेतलेली आहे. या ठिकाणी शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी भारतीय या हे उत्तर प्रदेश मधील कामगार या ठिकाणी काम करत करतात. 


शनिवार दुपारी दुपारी जेवण बनवण्यावरून नीरजकुमार कुशवाह आणि शुभम भारतीय यांच्यात वाद झाला होता. हा वाद जांभळकर यांनी मिटवला होता. त्यानंतर संध्याकाळी रात्री उशिरा नेहमीप्रमाणे हे सर्वजण कामावरून घरी आले. त्यानंतर गावात सुरू असलेल्या मारुती महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्याचा त्यांनी आस्वाद घेतला. मात्र रात्री उशीरा साडेबारा वाजता घराच्या स्लॅप वर जांभळकर यांना जोरजोराने ओरडल्याचा आवाज आला. जांभळकर यांनी तात्काळ वरती जाऊन पाहिले असता नीरजकुमार कुशवाह हा कोयत्याने शुभम भारतीय याच्यावरती वार करत होता. यानंतर जांभळकर यांनी इतर कामगारांच्या मदतीने जखमी झालेल्या शुभम भारतीय याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं.  पण उपचारादरम्यान शुभम भारतीय याचा मृत्यू झाला. 


अंबरनाथमध्ये महिलेचा मृत्यू
अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या गीता गुप्ता या झोपेत असताना त्यांच्या छताच्या स्लॅबचा काही भाग कोसळून त्यांच्या अंगावर पडला. त्यात त्या आणि त्यांची मुलगी गंभीर जखमी झाले. दरम्यान गीता गुप्ता यांना उपचारार्थ आधी अंबरनाथ आणि त्यानंतर उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


गीता गुप्ताच्या इमारतीत राहत होत्या ती इमारत जर्जर अवस्थेत आहे.असं असून सुद्धा पालिकेने अजून या इमारतीला कोणत्याही प्रकारची धोकादायक असल्याची नोटीस बजावलेली नाही ,त्यामुळे पालिकेच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जातीय.दरम्यान दुर्घटना झाल्यानंतर देखील पालिकेने कोणतीही गांभीर्य न दाखवत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. या इमारत दुर्घटनेनंतर अंबरनाथ शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे