COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदापूर : खिशाला परवडत नसेल तर कांदा खाऊ नका. वर्षभर कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही. जैन समाज तर कांदाच खात नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि जे कांदा खावून रडतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, असा शहाणपणाचा अजब सल्ला दिलाय, राज्याचे  सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी.


बाजारात कांद्याचे भाव जरा वाढले की कांदा खाताना डोळ्यात पाणी आलं असं पत्रकार लिहितात. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत असेल तर मिळू द्या असं म्हणत, सुभाष देशमुखांनी यावेळी पत्रकारांना सुनावलं. शेतकऱ्यांना  दिवस चांगले आले आहेत,असं लिहिलं तर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल असा युक्तीवादही यावेळी त्यांनी केला. इंदापूरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.