Nashik Lok Sabha Nivadnuk Nikal 2024:  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील अपक्ष उमेदवार बाबू भगरे गायब असल्याची चर्चा आहे. बाबू भगरे यांची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. मात्र, 1लाख  मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेत. बाबू भगरे सायंकाळपर्यंत घरी न आल्यास नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांचा मुलगा रणजित भगरे यांनी म्हंटल आहे.  त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्यानं कुटुंबियांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबू भगरे आणि विजयी उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावात साधर्म् आहे.  तिसरी पास असलेले  बाबू भगरे हे नाशिकमधील गंगावाडी गावातील रहिवासी आहेत.  बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात.  तरीही त्यांच्या नावापुढे होता सर म्हणून उल्लेख होता.  विजयी उमेदवार भास्कर भगरे शिक्षक असूनही त्यांच्या नावासमोर सर उल्लेख नव्हता.  बाबू भगरे यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. 


नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भास्कर भगरे विजयी 


नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे भास्कर भगरे विजयी झालेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, डॉ. भारती पवार या भाजपकडून उमेदवार होत्या. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा भाजपला फटका बसल्याचं येथील मतदारांचं म्हणणं आहे.


नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी पराभवाचं खापर फोडत पक्षाला घरचा आहेर दिलाय. पक्षानं उशीरा उमेदवारी दिल्यानं पराभव झाल्याची तक्रार हेमंत गोडसेंनी केलीये...त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकरी नाराज असल्याचा फटका बसल्याचंही हेमंत गोडसे म्हणालेत...