Railway Station in India : प्रत्येक विकसित आणि विकसनशील देशात रेल्वे नेटवर्क खूप महत्वाचे आहे, तर जर आपण भारतीय रेल्वे नेटवर्कबद्दल बोललो तर ते जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. आपल्या देशात दररोज करोडो लोक ट्रेनने प्रवास करतात. आपल्या देशात आजही जिथे विमान सेवा नाही तिथे रेल्वेचे जाळं पसरलंय. भारतात 2.5 कोटींहून अधिक प्रवासी 13 हजारांहून अधिक गाड्यांमधून सुमारे 68 हजार किलोमीटरचा प्रवास करतात आणि सात हजारांहून अधिक स्थानकांवरून दररोज ये जा करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत देशातील सर्वाधिक रेल्वे मार्ग कोणत्या राज्यात आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? देशातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क उत्तर प्रदेशमध्ये आहे. जो 9077.45 किलोमीटरवर पसरलेला आहे. हे रेल्वेचे जाळे राज्याच्या चारही दिशांना पसरलेले आहे. लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे, या स्थानकावरून दररोज 300 हून अधिक गाड्या जातात. या स्थानकावर 15 प्लॅटफॉर्म आहेत ज्यातून दररोज 3.50 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश वास्तुविशारद जे.एच. यांनी तयार केलंय. जर आपण रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर बोललो तर ते राजस्थानचे आहे.


सर्वाधिक रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात?


बिहारमध्ये सर्वाधिक रेल्वे स्टेशन आहेत. बिहारमध्ये 704 रेल्वे स्टेशन आहेत. या राज्यातील रेल्वे नेटवर्कमध्ये दैनंदिन 250 पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची सेवा आहे. तर सिक्कीम हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे रेल्वे स्टेशन नाही. तर भारताच्या शेवटचं टोक मिझोराम राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनचं नाव बैराबी असं आहे. हे स्थानक उत्तर मिझोराममध्ये असून आयझॉल शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर उभारलंय. 


'या' राज्यात आहे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन!


देशात सर्वाधिक कमाईमध्ये रेल्वे स्थानकांची संख्या ही 28 आहे. गुजरातचे अहमदाबाद रेल्वे स्थानक या यादीत 26 व्या स्थानावर आहे. तसंच 27 व्या स्थानावर सूरत रेल्वे स्टेशन आहे. महाराष्ट्राचे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक NCG-1 च्या यादीत 28 व्या क्रमांकावर आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानक सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन आहे.