clapped with one hand : मराठीत एक म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थात तुम्ही कधी एका हाताने टाळी वाजेल असा विचार केला आहात का? असेल तर तुम्हाला वेढ्यात काढले जाईल. परंतु अखेर एका हाताने टाळी वाजली आहे. आता तुम्हाला एका हाताने टाळी वाजणार नाही, म्हणण्यापूर्वी दोन वेळा विचार करावा लागेल. कारण वर्ध्याच्या रोशने एका हाताने टाळी वाजविली आहे. त्याच्या नावावर तो विक्रमही नोंदवला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका हाताने टाळी वाजत नाही, ही म्हण आता सांभाळून म्हणावी लागेल. वर्ध्यातील सोनोरा ढोक येथील रोशनने एका हाताने टाळी वाजविण्याचा विक्रम केला आहे. याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड घेतली आहे. रोशन लोखंडे या युवकाने एका हाताने 30 सेकंदात 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजविल्या आहेत. त्याच्या अद्भुत कलेना वाव मिळण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2022 बुक मध्ये रोशनच नाव नोंदविले केलेय.



एका हाताने टाळी वाजत नाही, त्यासाठी दोन्ही हाताची आवश्यकता असते, असे म्हटले जायचे. आता याला हा अपवाद आहे. कारण आता एका हाताने टाळी वाजू शकते. ते रोशन आपल्या कलेतून दाखवून दिले आहे आहे. मला लहानपणापासून एका हाताने टाळा वाजता येत आहे. ती मला कला अवगत झाली होती. त्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याबद्दल माहिती मिळाली. मला जेव्हा कळलं तेव्हा मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी मला एक टाळी वाजविण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड पाठविण्यास सांगितला. त्यानंतर मी तो त्यांना पाठवून दिला. त्यानंतर मेलवर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यानंतर एका हाताने टाळी वाजविण्याची नोंद करण्यात आली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2022 मध्ये एका हाताने टाळी वाजविण्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला, अशी माहिती रोशन लोखंडे यांनी 'झी 24 तास'शी बोलताना दिली.