भारत-चीन सीमेवर तणाव कायम- लष्करप्रमुख
भारत आणि चीनमधील सीमा निश्चित झालेल्या नसल्याचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं.
नाशिक : भारत आणि चीनमध्ये तणाव कायम असून कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जवानांना दिल्या असल्याचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे जनरल बी. सी. जोशी मेमोरिअल व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत आणि चीनमधील सीमा निश्चित झालेल्या नसल्याचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं. यामुळे अद्याप दोन्ही देशांत तणाव कायम असून यावरुन दोन्ही देशांत मतभेद असल्याचं ते म्हणाले. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.