अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून बहुतांश क्षेत्रातील नोकरदारांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे सुटीचा आनंद घेत ते कुटुंबासोबत दीर्घ वेळ घालत आहे. परंतु देशाचे रक्षण करणारे जवान मात्र आजही सीमेवर तैनात आहे. याच जवानांपैकी लॉकडाऊनपूर्वी सुटीवर आलेल्या अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्दमधील जवान मात्र त्याची सुटी कुटुंबासोबतच मेळघाट मधील सहा गावातील ३५ आदिवासी तरुणांन सोबत घालत आहे. यादरम्यान मागील तीन महिन्यांपासून त्यांनी या तरुणांना पोलीस भरती पासून ते सैन्याच्या भरतीचे सर्व प्रशिक्षण ते देत आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील सुधीर वानखडे हे अठरा मॅटिलिय बटालियन मध्ये पंजाब राज्यात गेल्या अनेक वर्षपासून कार्यरत आहे. अशातच लॉकडाऊन दरम्यान २४ तारखेला सुटी घेऊन सुधीर वानखेडे हे जवान त्यांच्या मुळगावी शेंदोळा येथे पोहचले परन्तु त्यांची पत्नी ही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोराळा या गावात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असल्याने सुधीर वानखडे हे जवान  सुद्धा बोराळा येथे आपल्या कुटूंबासोबत सुटी घालवण्यासाठी गेले. याच दरम्यान या गावातील काही आदिवासी तरुण पोलीस भर्तीसाठी सकाळी व्यायाम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी त्या आदिवासी तरुणांना पोलीस ते सैन्य भर्ती पर्यतचे सर्व प्रशिक्षण मोफत देण्याचे ठरवले त्याला आदिवासी तरुणांनी ही प्रतिसाद दिला. सुरवातीला पाच आदिवासी तरुणांनांपासून सुरू झालेल्या तरुणांची संख्या आता ३५ वर गेली आहे. या मध्ये चिखलदरा तालुक्यातील बोरळा गावसोबतच परिसरात ५ गावातील तरुनही या प्रशिक्षनात सहभागी होतात. मेळघाटातील आदिवासी बांधवावर अंधश्रद्धाचा मोठा पगडा असल्याने पोलीस प्रशिक्षना बरोबरच अंधश्रद्धा निर्मुलनाच कामही हा जवान करतोय.

गाव साखर झोपेत असताच पहाटे चार वाजता पासुन हा जवान तरुणांच्या मोफत प्रशिक्षनाला सुरवात करतो. जवळापास सकाळी साडे सहा वाजेपर्यंत व सायंकाळी दोन तास या तरुणांना कसरतिचे प्रशिक्षण हा जवान देतोय. मागील तीन महिन्यांपासून सूरु असलेल्या या कठीण प्रशिक्षना मूळे अनेक सकारात्मक बदल या तरुणामध्ये दिसून येत आहे. यामध्ये या गावातील मुलीही सहभागी होत असतात. पोलीस व सैन्य भरतीसाठी लागणारे प्रशिक्षण हे हा जवान अगदी मोफत देत असल्याची जाणीव ठेवून हे तरुण देखील त्याच्या या कार्याला प्रतिसाद देत आहे. आगामी काळात होणाऱ्या पोलीस व सैन्य भर्ती मध्ये ३५ पैकी ८ ते १० तरुनाची निवड होईल असा आत्मविश्वास देखील सुधीर वानखडे यांना आहे.

प्रशिक्षकांसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च देखील वानखडे यांनी केला आहे. या प्रशिक्षनावर वानखडे सांगतात मेळघाटातील मुलं हे खूप जिद्दी आहे कर्तृत्ववान आहे. सुरवातीला त्यांच्या मध्ये असलेलं इच्छा जिद्द हे पाहून आपणही यांच्या साठी काहीतरी करावं कारण आपण ज्या परिस्थिती मधून गेलो त्या परिस्थितीतून हे तरुण जाऊ नये अशी अस वानखडे म्हणाले दरम्यान वानखडे देत असलेल्या प्रशिक्षनामुळे आमच्या मागील दिन महिन्यात खूप बदल झाला आहे त्यामुळे आम्ही पोलीस भर्ती शाररिक चाचणीत आम्ही पास होऊ पण आम्हाला अभ्यास करायला एक वाचनालय व व्यायाम करायला एक जिम सुरू करायची मागणी या तरुणांनी केली आहे.

सुधीर वानखडे हे तरुणांना परीक्षण देण्यासाठी झटत असतानाच त्यांची पत्नी ही आरोग्य सेविका असल्याने कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून त्या मेळघाटात काम करत आहे. जवान वर्षभर हा सिमेवर तैनात असतो वर्षभरापासून मिळालेली एक सुटी त्याच्या साठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असते. परंतु या सुट्टीतही देशासाठी सैनिक घडवण्याच्या जिद्दीने मात्र सुधीर यांना स्वस्त बसू दिले नाही. मागील तीन महिन्या पासून मेळघाटातील आदिवासी तरुणांसाठी ते घेत असलेल्या मेहनतीचा रस्ता हा मात्र तरुणांच्या उज्वल भविष्याकडे घेउन जाणारा आहे.