मुंबई : काँग्रेससाठी धक्कादायक अन भाजपसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ काँग्रेस नेता कृपाशंकर सिंह हे बुधवारी 7 जुलैला भाजपप्रवेश करणार आहेत. कृपाशंकर सिंह हे उद्या विधानसभा विरोधी पक्षनेता देंवेद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत.  येत्या 2022 मध्ये मुंबईत महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका समजला जात आहे. (indian national congress leader kripashankar singh will be join bjp  on  7 july 2021) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपची उत्तर भारतीय मतांवर नजर


कृपाशंकर सिंह यांचा स्वत:चा असा मतदारवर्ग आहे. तसेच ते मुळचे उत्तर भारतीय असल्याने त्याचा फायदा थेट हा भाजपला होणार आहे. याचा फायदा भाजपला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो. मुंबईत एकूण 40 ते 50  लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. हाच आकडा एकूण टक्केवारीपैकी 25 टक्के इतका आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मतदार कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशानंतर पाठीशी राहणार की काँग्रेसलाच साथ देणार, हे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कळेल. 


कृपाशंकर सिंह यांच्याबद्दल थोडक्यात


कृपाशंकर सिंह हे  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. कृपाशंकर यांच्यामुळे काँग्रेसला आतापर्यंत  उत्तर भारतीयांची मत मिळाली आहेत. 2004 मध्ये कृपाशंकर हे राज्यमंत्रीपदी होते. तसेच 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत यस मिळाले होते. कृपाशंकर यांनी आतापर्यंत मुंबई काँग्रेस अध्यक्ष,  आमदार, राज्यमंत्री यासारखी महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.