कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील मातीमध्ये तयार झालेल्या खेळाडूंनी कुस्तीसोबतच इतर खेळांतही आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिक याने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याने सध्या त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.


ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धा ही इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. खास बाब म्हणजे, तब्बल १९ वर्षांनंतर भारतीय रेसरने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. यापूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयन याने ही कामगिरी केली होती.



५ आणि ६ ऑगस्ट रोजी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील दुसऱ्या रेसमध्ये कृष्णराजने पहिला क्रमांक पटकावला. पहिल्या रेसमध्ये आठव्या क्रमांकावर कृष्णराज होता. मात्र, त्यानंतर कृष्णराजने जिद्द आणि समयसूचकतेचा वापर करत इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजय मिळवला. 


गो कार्टिंगमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर गेल्या ४ वर्षापासून कृष्णराज फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये सहभाग घेत आहे.