Konkan Railway : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे तिकीटाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी Update; मध्य, पश्चिम रेल्वेनं...
Ganeshotsav 2024 : अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवामुळं सध्या सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच अनेकांची गावाकडे जाण्यासाठीची तयारी सुरू आहे.
Ganeshotsav 2024 : कोकणातील गणेशोत्सव काही औरच... असं अनेकांकडून ऐकायला मिळतं आणि या गणेशोत्सवाची एक झलक पाहिल्यानंतर याची प्रचितीसुद्धा येते. कोकण आणि गणेशोत्सव हे अलिखित समीकरण झालेलं असतानाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा उभा राहतो तो म्हणजे इथवर पोहोचण्याचा. शिमगा आणि गणेशोत्सव या दोन सणांच्या निमित्तानं नोकरीधंद्यासाठी शहराच्या दिशेनं निघालेल्या अनेकांचेच पाय गावांकडे वळतात.
तिकीट आरक्षणाचा प्रयत्न करताय?
यंदाच्या वर्षीसुद्धा चित्र फारसं बदललेलं नाही, कारण इथं अनेकजण गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीट आरक्षणाचा प्रयत्न करत असतानाच तिथं रेल्वेकडून एक महत्त्वाचा संदेश प्रवाशांना येऊ लागला आहे.
असंख्य प्रवासी रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील असतानाच एक मेसेज कैक प्रवाशांना मिळाला आहे. प्राथमिक स्वरुपात प्रवाशांचा मोठा आकडा पाहता मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वगाड्या सोडण्याचा निर्णय घेत त्यासाठीचं आरक्षणही सुरू केलं. आरक्षण प्रक्रिया सुरू होताच अवघ्या काही मिनिटांतच प्रतीक्षा यादी पूर्ण झाली.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्या आणि सणवारांच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. पण, सध्या मात्र या कालावधीत सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादीही पूर्ण झाली आहे. प्रवाशांना तसे मेसेजही पाठवले जात आहेत.
हेसुद्धा वाचा : एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सरप्राईज; अभिनव उपक्रमावर जीव ओवाळून टाकाल
लागून आलेल्या सुट्ट्यांमुळं अनेकांचा गोंधळ
गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच त्याआधी येणारा स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधननिमित्त आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये मुंबई ते रत्नागिरी, सावंतवाडी, चिपळूण मार्गावर रेल्वे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात तिकीट आरक्षणं केली आहेत. अनेकांनीच गणेशोत्सनानिमित्त तयारी करण्यासाठी म्हणून गावाकडे जाण्याचं ठरवलं असून, संधी मिळताच तिकीटाचं आरक्षण केलं आहे.
15 ते 19 ऑगस्टपर्यंत सलग सुट्ट्या असल्यामुळं कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांतील आरक्षणासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे. दरम्यान या स्थानकांदरम्यान स्वतंत्र्यदिन विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात याव्यात, अशी मागणीही प्रवाशांकडून केली जात आहे. गणेशोत्सन सुरु होण्याआधीच ही अवस्था असल्यामुळं आयत्या वेळी गावची वाट धरू पाहणाऱ्यांवर आता डोकं धरायची वेळ आली आहे.