Summer Special Trains in Marathi: शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी पडताच अनेकजण फिरण्याचा किंवा गावी जाण्याचा प्लॅन करतात. याचपार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळी विशेष गाड्यांच्या जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वे प्रशासननाने पुणे- दानापूर, पुणे-गोरखपूर अशा विशेष गाड्यांच्या 20 फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात प्रवाशांना या उन्हाळी विशेष गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे.  


पुणे-दानापूर उन्हाळी विशेष ट्रेन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाडी क्र. 01415 पुणे-दानापूर उन्हाळी विशेष ट्रेन पुण्याहून 20 एप्रिल, 24 एप्रिल आणि 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:55 वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता दानापूरला पोहोचेल. तर गाडी क्र.01413 दानापूर-पुणे उन्हाळी विशेष ट्रेन 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 30 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता दानापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:35 वाजता पुण्याला पोहोचेल. या दोन गाड्या दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबतील.


पुणे-गोरखपूर-पुणे उन्हाळी विशेष ट्रेन (6 फेऱ्या)


गाडी क्र. 01419 पुणे-गोरखपूर उन्हाळी विशेष ट्रेन पुण्याहून 20 एप्रिल, 24 एप्रिल आणि 28 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:50 वाजता गोरखपूरला पोहोचेल. गाडी क्र. 01420 गोरखपूर-पुणे उन्हाळी विशेष ट्रेन गोरखपूर येथून 21 एप्रिल, 25 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 6:40 वाजता पुण्याला पोहोचेल. या दोन गाड्या हडपसर, दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना राणी लक्ष्मीबाई झांसी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती येथे थांबतील.


पुणे-दानापूर-पुणे उन्हाळी विशेष ट्रेन (8 फेऱ्या)


गाडी क्र. 01417  पुणे-दानापूर उन्हाळी विशेष गाडी पुणे स्टेशनवरून 18 एप्रिल, 21 एप्रिल, 25 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता दानापूरला पोहोचेल. गाडी क्र. 01418 दानापूर-पुणे उन्हाळी विशेष गाडी दानापूर येथून 19 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल, 30 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.45 वाजता पुण्याला पोहोचेल. प्रवासादरम्यान या गाड्यांना हडपसर, दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबतील.