रेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; `हे` घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Ganpati festival Railways: कोकण आणि गणेशोत्सव हे पूर्वापार चालत आलेलं नातं आहे. कितीही अडचणी असूदेत कोकणचे चाकरमानी गणपतीला गावी जातातच. पण एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था असताना चाकरमान्यांना भारतीय रेल्वेकडूनच आशा आहेत. त्यातही पहिल्या दिवशीच बुकींग फूल झाल्याने चाकरमान्यांचे टेन्शन वाढले होते. पण आता रेल्वेने कोकणवासीयांनासठी मोठे गिफ्ट दिले आहे.
कोकणात दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीची तयारी उत्सवाच्या काही महिने आधीपासून सुरू होते. दरवर्षी लाखो लोक मुंबईतून आपापल्या गावी जातात. अशा परिस्थितीत दरवर्षी प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढणे कठीण होऊन बसते. ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-कुडाळ दरम्यान 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.
2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या. त्याचबरोबर गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 40 विशेष रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात आली होती, त्यानंतर आता या वर्षी एकूण 266 गाड्या धावणार आहेत.
मुंबई-कुडाळ गणपती विशेष ट्रेन
ट्रेन क्रमांक 01185 विशेष 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी 00.45 वाजता लोकमान्य तिळकहून रवाना होऊन त्याच दिवशी 11.30 वाजता कुडाळ पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01186 स्पेशल 13 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 12.10 वाजता कुडाळहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, रोहा, मंगोवन, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबेल.
त्याचबरोबर गणपती उत्सवासाठी लोकांची गर्दी कमी व्हावी यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच स्पेशल ट्रेनसोबत विशेष भाडेही ठेवण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने विशेषत: गणपती उत्सवासाठी 40 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत. या विशेष गाड्या मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी दरम्यान धावतील.
ही गाडी 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरदरम्यान सावंतवाडीतून निघून 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल.प्रत्येक दिशेने 15 सेवा चालवल्या जातील आणि गाड्यांना 24 डबे असतील.
वसई-पनवेल-रोहा असा या गाडीचा मार्ग असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे उधना ते मडगाव दरम्यान सहा साप्ताहिक गणपती विशेष गाड्या चालवणार आहे.
15 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी उधना आणि 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी मडगावहून सुटणार आहे. प्रत्येक दिशेला तीन सेवा असलेल्या या गाडीला २२ डबे असतील आणि ती वसई-पनवेल-रोहा मार्गेही धावेल.