मुंबई : शिरूरमध्ये इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि यूट्यूब चॅनेलवाल्यांना चांगलंच फैलावर घेतलं. आपल्या विधानांचा विपर्यास करतात. प्रसिद्धीसाठी, टीआरपीसाठी बदनाम करतायत असा आरोपही त्यांनी केलाय. किर्तनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो असंही ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचे हजारो लोकं फॅन आहेत. त्यांचं किर्तन ऐकण्यासाठी अनेक लोकं आवर्जून जात असतात. त्यांच्या किर्तनासाठी आलेला प्रत्येक जण पोट धरुन हसत असतो. 


इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आहेत. शिरूर तालुक्यात किर्तन सुरु असताना ते अचानक थांबले. मोबाईलवर शूट करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी मोबाईल बंद करण्यास सांगितले.


इंदोरीकर महाराजांनी चांगलंच सुनावलंय. "माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून अनेकांनी लाखो रुपये कमावले. असा आरोप ही त्यांनी केला होता.


इंदोरीकर महाराजांचे किर्तन तरुणांमध्ये चांगलेच गाजत असतात. युट्युबवर ही हजारो लोकं त्यांचं किर्तन आवर्जुन पाहतात.