Pune Indurikar Boy Dance: कीर्तनकार निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाला आजही तुफान गर्दी पहायला मिळते. समाजाला प्रबोधनाचे धडे देणारे इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशातच सध्या त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Trending Video) झाल्याचं पहायला मिळतंय.


नेमकं काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की... इंदुरीकर महाराज नेहमीप्रमाणे कीर्तनाच्या (Indurikar Maharaj kirtan) स्थळी पोहोचले. त्यावेळी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी गर्दी केली. कीर्तनासाठी स्टेज उभा करण्यात आला. वृद्ध, तरुण सोडा... चिल्ल्या पिल्ल्यांनी देखील गर्दी केली. त्यावेळी एक मुलगा समोर येऊन नाचू लागला. पोराचा डान्स पाहून लोकांनी आरडाओरड सुरू केली तर काहींनी पोराला प्रोत्साहित केलं. पोराला पाहून इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj Video) त्याला स्टेजवर बोलावलं.


आणखी वाचा - Video : चंद्रा गाणे सुरु होताच चिमुकला उभा राहिला अन्.... तुम्हीही म्हणाल असं नाचता आलं पाहिजे


खाली बसलेल्या लोकांनी त्याला स्टेजवर जाण्यास सांगितलं. त्यावेळी पोरगं (Pune Indurikar Program Boy Dance Video) पळत पळत स्टेजवर गेलं. इंदुरीकर महाराजांनी त्याला माईक समोर उभं केलं. त्यावेळी त्यानं हाई झुमका वाली पोररररर.... हे गाणं गायलं तर डान्सच्या काही स्टेप्सही करून दाखवल्या. त्यावेळी पोराचा अवतार पाहून इंदुरीकर महाराजांनी डोक्यावर हात लावलाय.


पाहा Video - 



दरम्यान, अनेकदा इंदुरीकर महाराज त्यांच्या वक्तव्यामुळे वादात देखील सापडले आहेत. खासकरून महिलांवर केलेल्या वक्तव्यामुळे ते अनेकदा अडचणीत सापडले आहेत. समाजाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात सांस्कृतीत समाज विसरत चाललो आहोत, असं मत इंदोरीकर महाराज मांडतात. त्यामुळे नेहमी दुय्यम मतप्रवाह तयार होताना दिसतात. मात्र, ग्रामीण भागात त्यांच्या कीर्तनाची क्रेझ दिसून येते.