Nashik Crime News : तुमच्या विम्याचे हप्ते कुणाच्या खिशात? नाशिकमध्ये इन्शुरन्स घोटाळा उघड
Insurance scam exposed in Nashik : नाशिकमध्ये बनावट प्रमाणपत्र देऊन लाखोंचा गंडा घाणल्यात आल्याचा धक्कदायक प्रकार समोर आलाय. इन्शूरन्स घोटाळ्यामधील आरोपी एजंट संदीप देशमुख याला न्यायलयीन कोठडीत सुनावण्यात आलीये.
Insurance fake certificate scam : नाशिकच्या मनमाडमधील युनियन बँकेतील एफडी घोटाळा ताजा असतानाच याच बँकेच्या सिस्टर कन्सनमधी इन्शूरन्स घोटाळा समोर आलाय. स्टार युनिअन डाय हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये हा घोटाळा झालाय. एफडी घोटाळा करणाऱ्या संदीप देशमुख या एजंटनेच विमा धारकांच्या तब्बल 68 लाखांच्या हफ्त्यावर डल्ला मारल्याचं समोर आलं. हा आकडा साडेतीन कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आरोपी एजंट संदीप देशमुख हा सध्या एफडी घोटाळा प्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहे. देशमुख याने अशा प्रकारे अजून कुणाची फसवणूक केली असेल तर तक्रार दाखल करण्याचं आवाह पोलिसांनी केलंय.
तुमच्या विम्याचे हप्ते कुणाच्या खिशात?
विमाधारकांकडून हप्त्याचे पैसे घेतले. मात्र, विमाधारकांना हप्ता भरल्याचं बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं. एजंटने घोटळा केला अन् हप्त्याचे पैसे कंपनीमध्ये भरलेच नाहीत. एक दोन नाही तर 68 लाख रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. हा घोटाळा साडेतीन कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय.
आरोपी एजंट संदीप देशमुख हा सध्या एफडी घोटाळा प्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहे. संदीप देशमुख याने अशा प्रकारे अजून कुणाची फसवणूक केली असेल तर तक्रार दाखल करण्याचं आवाह पोलिसांनी केलंय. तुम्हीही जर विम्याचे हप्ते एजंटमार्फत भरत असाल तर सावध व्हा.. तुमच्या विम्याचे हप्ते भरले जात आहेत की नाही याची खात्री करा. नाहीतर तुमच्या कष्टाच्या कमाईवर संदीप देशमुखसारखे एजंट डल्ला मारतील.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूरमधून देखील असाच एक घोटाळा समोर आला होता. विमा कंपनीतून रुग्णांना विमा मिळवून देण्यासाठी बनावट चाचणी अहवाल सादर करून प्रमाणित डॉक्टरच्या नावाचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. नागपूरच्या इंदोरा चौकातील शाश्वत हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजीव चौकसे व स्टार 24 पॅथ लॅबच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. बुटे यांच्या नावाचे लेटरहेड तयार करून बनावट स्वाक्षरी केल्याचे त्यावर आढळले. डॉ. बुटे यांनी पाचपावली पोलिसांत तक्रार दिली होती.