Dahi Handi 2022 : काही दिवसांवरच गोपाळकाल्याचा सण ठेपलेला असतानाच सगळीकडे जोरदार तयारी सुरु झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उत्साह पाहायला मिळत आहे. मानवी मनोरे रचण्याच्या सरावासाठी गोविंदा पथकांनी सुरुवातही केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र दोन वर्षांनी पुन्हा निर्बंधमुक्त सण साजरे करण्याची परवानगी मिळाल्यामुळे अतिउत्सहाच्या भरात अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. दहीहंडी उत्सव साजरा करताना अनेक गोविंदा जखमी होतात. तर काहींचा मृत्यू देखील होतो.


त्यामुळे गोविंदाच्या सुरक्षेसाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. दहीहंडी उत्सहाचे आयोजन करण्यासोबतच राजकीय पक्षांनी गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येणार आहे.


भाजपचे गोविंदांसाठी 10 लाखांचं विमा कवच


भाजपने गोविंदांसाठी 10 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी दहिहंडीत बरेच गोविंदा पथकातील गोविंदा आपले अवयव गमावतात. त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे म्हणूनच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून गोविंदांसाठी 10 लाखांचा विमा देण्याचं निर्णय भाजप मुंबईने घेतला आहे. गोविंदांनी यात सहभाग घ्यावा, असे ट्विट भाजप आमदार अमित साटम यांनी केले आहे.



मनसे काढणार 1 हजार गोविंदाचा मोफत विमा


दहिकाल्याच्या दिवशी नवी मुंबईतल्या अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना मनसेकडून सुरक्ष कवच देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. या योजनेतील विम्याची मुदत 19 ऑगस्टचा पूर्ण दिवस असेल.


या विमा योजनेनुसार गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये मिळणार आहेत. तर गोविंदाला कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 10 लाख रुपये मिळतील. अपघातामुळे रुग्णालयातील खर्चासाठी 1 लाख रुपये मिळणार आहेत.



दरम्यान, सुरक्षा कवच योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची नावे वयासह  नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असं आवाहन मनसे नवीमुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, असंही गजानन काळे यांनी स्पष्ट केल