भिवंडी : येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरील लंगडी खेळाडूचा मृत्यू झाला. रेहान अकील शेख असं या खेळा़डूचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडी तालुक्यातील आनगाव इंथं ही दुदैवी घटना घडीली. १२वीत शिकणारा रेहान हा चौथीच्या वर्गात शिकत असल्यापासून लंगडी खेळात चमकत होता. त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठाणे जिल्याचे प्रतिनिधित्व केले होते.


मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तर जानेवारी २०१७ मध्ये महाविद्यालयीन स्तरावर नेपाळ येथे झालेल्या दक्षिण एशियन लंगडी स्पर्धेत भारतीय युवा संघाचे नेतृत्व करीत सुवर्णपदक पटकावले होते. तर आता त्याची सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई लंगडी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. 


रेहान या स्पर्धेसाठी  घराच्या टेरेसवर सराव करीत असताना त्याचा अचानक पाय घसरून तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.