मुंंबई : आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या अभिनेता अरबाज खानची आज चौकशी केली जाणार आहे. यासाठी तो ठाण्यातील गुन्हेगारी शाखेत पोहचला आहे. अरबाज आणि सोनू मलाड ऊर्फ सोनून जलान यांची एकत्र चौकशी केली जाणार आहे. सट्टेबाजीप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं हे समन्स बजावलं होतं. तीन दिवसांपूर्वी सोनू मलाड ऊर्फ सोनू जलान याला ठाणे गुन्हे शाखेनं आयपीएलवर सट्टा लावल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यातच सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानचंही नाव पुढं आलंय. अरबाजनं आयपीएल सामन्यांमध्ये सट्ट्यासाठी पैसे लावल्याची कबुली सोनूनं दिलीय. सोनू जलानचा रवी पुजारी आणि दाऊदच्या टोळीशी संबंध असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 


सलमान खानची घेतली भेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 9.30 दरम्यान गॅलेक्सी अपार्टमेंंटमध्ये अभिनेता सलमान खान आणि अरबाजमध्ये बोलणी झाली. त्यानंतर अरबाज बॉडीगार्ड शेरासह बाहेर पडला. मुंंबईत सकाळी मॉनिंग  वॉक करताना काही मीडीया प्रतिनिधींशी सलीम खान बोलले. त्यावेळेस सलीम खान यांनी अरबाज खान विषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे टाळले. सोबत हे प्रश्न बेकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.   


 



 


अरबाज खानला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ? 


1. सोनू सोबतची मैत्री किती वर्षांची ? 
2.पहिल्यांदा सोनू सोबत भेट कधी झाली? 
3.सोनूला कितीवेळेस भेटला? भेटीदरम्यान तिथे इतर लोकंही होती का? 
4. सोनूचं बॉलिवूड कनेक्शन आहे का? 
5.सोनू क्रिकेट मॅचमध्ये सट्टा लावतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
6.सोनूचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत हे तुम्हांला ठाऊक आहे का? 
7. किती वेळेस तुम्ही सामन्यांवर पैसे लावले आहेत? 
8. 3 कोटींचं काय प्रकरण आहे? ज्यावर सोनू तुम्हांला ब्लॅकमेल करतोय?
9. व्हिडिओ कुठे बनवलेला आहे? 
10. तुमच्यासोबत इतर कोणकोणत्या व्यक्ती यामध्ये सहभागी आहे?
11.सलमान खानला याबाबत ठाऊक आहे का ? 
12. तुम्ही सट्टेबाजी करता याबाबत तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकोणाला माहिती आहे?
13. आतापर्यंत किती पैसे लावण्यात आले? 
14.दुबईच्या मीटिंगबाबत अधिक माहिती सांगा 
15.अंडरवर्ल्डशी काही संबंध आहे का? कोणाकोणाला ओळखता?
16. तुमच्या चित्रपटासाठीही अंडरवर्ल्डचे पैसे लावले आहेत का? 
17 दबंग आणि दाबंग 2 मध्ये कोणाचा पैसा लावण्यात आला ?