ठाणे :  बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला मोस्ट वॉण्टेड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर सारं काही विसरल्याचा बहाणा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पोलिसांच्या चौकशीत इकबाल सारंकाही विसरल्याचं भासवतोय. तसंच चौकशीला सहकार्य करत नसल्याचंही समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकबाल चौकशीदरम्यान बीपीच्या गोळ्या मागत असून प्रकृती बिघडल्याचाही कांगावा करतोय. त्याच्या चौकशीसाठी आता दिल्लीहून आयबीची टीम ठाण्यात  दाखल झालीय.


दरम्यान खंडणी प्रकरणात इकबाल कासकरला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन शर्मांनी जैस्वालांची भेट घेतली.


खंडणी प्रकरणात ठाणे महापालिकेच्या दोन नगरसेवकांचं कनेक्श्न उघड झाल्याची चर्चा आहे. त्यांना चौकशीलाही बोलवण्यात येणार आहे. त्यासंदर्भातच ही भेट होती का याबाबदत चर्चांना जोर आलाय.


तर दुसरीकडे इकबाल कासकरवर दुसरा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. ठाण्यातल्या नगर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झालाय. 15 ते 16 लाखांची ज्वेलरी खंडणी रूपात मागितली होती. त्या अनुषंगाने इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा नोंदण्यात आलाय.