ठाणे : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यात वादाची दरी निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर छोटा शकीलनं पाकिस्तान सोडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 


दाऊदचा मुलगा धार्मिक मार्गाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इक्बाल कासकरच्या चौकशीत ही माहिती समोर आलीय. दाऊदचा मुलगा मोईन धार्मिक मार्गाला लागलाय. त्याला डी कंपनीमध्ये अजिबात रस नसल्याची चर्चा गुन्हेगारी जगतात आहे.


हा दाऊदचा उत्तराधिकारी होणार?


छोटा शकील पाकिस्तान सोडून गेलाय. त्यामुळं दाऊदनंतर त्याच्या साम्राज्याचा वारसा भाऊ इक्बाल कासकरला मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.


दाऊद निरोप कारागृहात


दाऊदचा हा निरोप घेऊन इक्बालचा मुलगा रिझवान, अनिस इब्राहिमचा मुलगा आरिस आणि आणखी एक महिला ठाणे कारागृहात इक्बाल कासकरला येऊन भेटले, अशी माहिती देखील पोलिसांच्या हाती लागलीय.