IRCTC Navratri Thali: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व असते. याकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन देवीची विधिवत पूजा केली जाते. याकाळात नऊ दिवस देवीचे उपवासही केले जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय रेल्वेने खास सोय केली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) व्रताच्या थाळीचा समावेश केला आहे. उत्सवानिमित्त ई-केटरिंगमध्ये ‘व्रत का खाना’ सेवेंतर्गत नवरात्र थाळीचा समावेश करण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे. (Navratri Thali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआरसीटीसीकडे वंदे भारतसह सर्व एक्स्प्रेसमध्ये जेवण, नाश्ता पुरवण्याती जबाबदारी  आहे. सण-उत्सव असल्यास जेवणाचे खास आयोजन केले जाते. नवरात्रीतही प्रवाशांच्या जेवणाच्या गरजेनुसार व्रत का खाना अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. नवरात्रीत प्रवाशांना आता उपवासाचे पदार्थही मिळणार आहेत. आयआरसीटीसीच्या या निर्णयामुळं प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 


व्रत का खाना ऑर्डर सुरू करण्यासाठी गाडी सुटण्याच्या दोन तास आधी प्रवाशांना पीएनआरसह थाळीची ऑर्डर द्यावी लागणार आहे. प्री पेमेंट आणि पीओडी (पेमेंट ऑन डिलिव्हरी) असे दोन पर्याय प्रवाशांसाठी देण्यात आले आहेत. ही थाळी महाराष्ट्रातील 96 रेल्वे स्थानकात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात कल्याण, बोरिवली, वसई रोड यांचाही समावेश आहे.  येत्या काही दिवसांत अन्य रेल्वे स्थानकातही ही व्रताची थाळी सुरू करण्यात येणार आहे.


कशी ऑर्डर करता येणार


आयआरसीटीसीच्या वेबसाइटसह फुड ऑन ट्रॅक या मोबाइल अॅपवर व्रत का खाना आणि नवरात्र थाळीची प्री ऑर्डर आणि पे ऑन डिलिव्हरी या सुविधांचा वापर करुन तुम्ही ही थाळी मागवू शकता. 


या पदार्थांचा समावेश


व्रत का खाना या थाळीत साबुदाणा खिचडी, सुका मखाणा, साबुदाणा नमकीन, बटाट्याची टिक्की, जिरे आलू, फ्रेंच फ्राइज, साबुदाणा वडा, फलहारी थाळी, मलाइ बर्फी, रसमलाई, मिल्क केक, साधी बर्फी, लस्सी, दही या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.