मालवण : आयर्लंड देशाचे पंतप्रधान लिओ वराडकर आपल्या कुटुंबियांसोबत मायदेशी आले आहेत.  कोकणातील मालवणमधल्या वराड गावचे नागरिक अशोक वराडकर यांचे ते चिरंजीव. आपल्या मूळ गावी पहिल्यांदाच आलेल्या लिओ वराडकरांचा हा खासगी दौरा आहे. मायदेशी परतल्यामुळे त्यांना फार आनंद वाटत आहे. शिवाय त्यांनी यावेळी देवदर्शन सुद्धा घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच, लिओ वराडकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. अशोक वराडकर यांचे भाऊ वराड इथे राहातात, त्यांच्या घरी त्यांचा पाहुणचार सुरु आहे. लियो वराडकर आज रात्री मुंबईला रवाना होणार आहेत. 



एक कोकणातला मुलगा आता आयर्लंड देशाचे पंतप्रधानाच्या पदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे सर्व भारतीयांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळेस अशोक वराडकर यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. 


फार सुंदर वाटत असल्याचे सांगत ते म्हणाले की, 'लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. सर्व आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहील्या आहेत.' १९६६ साली इंग्लंडला गेलेल्या अशोक वराडकर यांनी त्यानंतर कधी मागे वळून पाहीले नाही.


पण आता मुलाला पंतप्रधान झाल्याचे पाहून त्यांना फार आनंद होत आहे. संपूर्ण कोकणासाठी नाही तर समस्त भारतीयांसाठी ही खुप आनंदाची गोष्ट आहे. ती म्हणजे भारताचे नागरिक असलेल्या अशोक वराडकर यांचे चिरंजीव लिवो वराडकर दुसऱ्या राष्ट्राचे पंतप्रधान झाले आहेत.